Friday, November 6, 2020

प्रवास...!!

आयुष्य हा एक प्रवास आहे,
ज्याची सुरवात अन् शेवट,                                  
एकट्यानेच सूरु होऊन एकट्यानेच संपतो...!!

त्या प्रवासाला आंनदायी कसं बनवायचं,                             

 हे पांथस्थ्याच्या चालण्यावर निर्भर असतं.                  प्रवासाचा महोत्सव करता यावा..!!

या वाटेवर रमतगमत चालायचं , वळणावर थांबायचं , चढ उतार आल्यावर वेग आवरायचा, भरभरून आस्वाद घ्यायचा....!!

आनंदाची फुले वेचायची, वेचताना ठेच लागली तरी पुन्हा उठायचं, ठेच देणाऱ्याचे आभार मानून, प्रवासाचा आनंद अनुभवत चालत राहायचं दिगंतरापर्यंत ......!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

अटळ 'अर्जुन'तम...!!

  प्रत्येकाची स्वतंत्र ही लढाई, कधी कृष्ण, कधी अर्जुन तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!! चूक बरोबर , चांगलं वाईट, याच्या परिसीमा व्यक्तीगणिक...