एके दिवशी मेट्रो सिटी असणाऱ्या पुण्याच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जे एम रोडवरून फिरत असताना ,
एक 8-9 वर्षाचा मुलगा अंगावर मळलेले कपडे,फाटलेला, बटनं नसलेला शर्ट घालून तो अन्, त्याची आई, सिग्नल ला फुगे विकत होते...!!
ते 8-9 वर्षाचं बालपण असंच फुटपाथवर धरणी मातेचा पलंग अन् आभाळाच्या छायेखाली झोपून चाललेलं ....! हे पाहिल्यावर मनावर वज्राघात झाल्यासारखं जाणवलं.
कोणीतरी अचानक धातुच्या घणाने डोक्यावर घाव घालावा अन् आपल्याला भोवळ यावी अन् मन सुन्न व्हावं, मनाची विचार करण्याची क्षमता संपली अन् पाय गळून गेल्यासारखं वाटायला लागलं...!!
अन् एक आम्ही लोकं एन्जॉय च्या नावाखाली बर्थडे करतो, पार्ट्या करतो...
या पार्ट्या अन् बर्थडे चे किस्से चवीने सांगतो , अन् म्हणतो की आम्ही खूप मज्जा केली, एन्जॉय केला....
तर त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला एक बालवयातील बाळ त्याचा अन् त्याच्या आईचा उदरनिर्वाह करण्यासाठी आतड्याला पीळ पडला तरी विचार न करता त्या फुग्यांमध्ये आपल्या आतड्यातली हवा भरून सिग्नल ला विकून पोट भरतोय....!!

एका बाजूला टाटा, अंबानी, अदानी चे उंच उंच महाल , महागड्या गाड्या ऐशोआरामी जीवन so called luxurious life....!!!
तर दुसऱ्या बाजूला एका विकसनशील भारतातील 8-9 वर्षाचा बालक टीचभर पोट भरण्यासाठी कासावीस होताना दिसतो...
का एवढी दरी असावी श्रीमंती अन् गरिबी मध्ये ..????
अहो, ही माणसं फुकट काही मागत नाहीत आपल्याकडे
त्यांना कष्टाचीच भाकर आवडेल;आवडते
पण त्यांच्या हाताला काम तरी द्या ...!!!!
एवढ्या दरीने कधी ना कधी उद्रेक हा होईलच ...!!!
प्रश्न पोटाचा असला तरी, आयुष्य जगताना नाईलाजास्तव का होईना हसत हसत उत्तरं ही शोधावीच लागतात...! मग तो फुगे विकणारा असो किंवा सायकलवर कागदी फुलांचे गुच्छ विकणारा असो किंवा सिग्नल वर देवाच्या नावाने काळी बाहुली विकणारा असो ....!!!
कोणीतरी विचारलं , "हिंदू आहेस का मुसलमान? -अन् खूप अजीब उत्तर आलं ........उपाशी आहे साहेब ...!!!"
ते रोडवरील दृश्य पाहिल्यावर मनातून आलं,
कोई समझ ना सका उस की मजबुरी...
जो सांसे बेच रहा था गुब्बारे में भर के...
आणि कोणीतरी लिहून ठेवलंय ...!!!
"भुक फिरती है मेरे मुल्क में नंगे पाओ रिज़्क ज़ालिम कि तिजोरी में छुपा बैठा है...!'
मित्रांनो , आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा...!! बक्कळ पैसा कमवा...!! तुमच्या शब्दाकोशात एन्जॉय चा जो अर्थ असेल त्यापद्धतीने एन्जॉय करा...
पण त्याच बरोबर मालक-साहेब एक करा; या लोकांना दोनवेळचं जेवण मिळेल एवढं त्यांच्यासाठी नक्की करा..!
तुम्ही luxurious life जगा पण माझ्या मित्रांनो ,या रोड वर असणाऱ्या लोकांसाठी, त्याचं टीचभर पोट भरण्यासाठी जमेल ते करा...!! आयुष्यात आपल्या महत्वकांक्षा खूप असतील पण त्यांच्या फक्त दोनवेळचं पोट भरेल एवढं जेवण हवं आहे...!!
तुमच्या कमाईतून त्यांच्या टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक छोटा वाटा काढून ठेवला तर ईश्वर तुम्हांस त्याच्या हजारपट देईल ....!!!
वामनराव पै नी कुठेतरी लिहून ठेवलंय,
"तुम्ही इतरांच्या बाबतीत जे जे कराल ते ते तुमच्याकडे हजारपटीने reflect होतं...
मग ते प्रेम असो, तिरस्कार असो, मत्सर असो ....!!"
हे लोकं वर आले तरच आपला हिंदुस्थान खरा विकसित देश बनेल ....!!!
साहेब, हे करत असताना
मदतीचे हात किती मोठे आहेत हे पाहण्यापेक्षा मदत करण्याची इच्छा किती मोठी आहे हे बघा .....!!!
कुठेच नसतं ठरवलेले मुक्कामाचं ठिकाण
स्वप्नांच्याच वाटेवर टीचभर पोटासाठी लोकांना मांडावं लागत दुकान...!!!!!!

#जिंदगी_का_फंडा 🌿🍃
श्वासाची किंमत तो फुगा फुटतानाही जाणवते!!!
ReplyDeleteवास्तविकता झेपलीही पाहिजे अन् जपलीही पाहिजे!
Keep writing!!!,����
धन्यवाद
Deleteसोमनाथ खूप छान लिखाण आहे खूपच वास्तववादी
ReplyDeleteधन्यवाद खूप आभारी आहे
Deleteतुमचं हेच वाक्य प्रेरणा देत राहत
Sir khup chhan
ReplyDeleteधन्यवाद सर
Delete.....आणि कवळता श्वास गुदमरला जातोय फुग्यामधे अडकून
ReplyDeleteकटुसत्य....!!
Deleteधन्यवाद
स्वाभिमान म्हणतात ते हेच का ? जिवंत राहण्यासाठी मिळेल ते काम आणि कष्ट करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे ...नाहीतर या जगात उत्तम मोबदला मिळत असताना सुद्धा कामचुकारपणा करणाऱ्यांची संख्या खूप आहे ....
ReplyDeleteAll the best for the future endeavours ...
वास्तववादी लिखाण आहे ...
Thank you so much ma'am 🙏
ReplyDelete