Wednesday, May 15, 2019

बकुळीची फुलं ....!!!

"देखो मगर प्यार से" ट्रक च्या पाठिमागे लिहिलेलं हे तीन शब्द जीवनाविषयीच तत्वज्ञान सांगून जातात...!!
     फुलांनी बहरलेल्या बागेतलं गर्द हिरवी पानं असलेलं झाड सुध्दा लक्ष वेधून घेतं, सुंदर दिसतं.
 दुसऱ्या फुलझाडांपेक्षा उठून दिसतं फक्त गर्द हिरवी पानं असतानाही ...!!   
पण, ते सूंदर दिसण्यासाठी एका स्वतंत्र दृष्टीने पाहायला हवं. 
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं. 
फुलांकडे पहा; काही फुलं दिसण्याने आकर्षित करतात, तर काही फुलांचा सुगंध आकर्षित करतो..!
पण मग आपण ही अपेक्षा कशी करू शकतो? 
सूंदर दिसणाऱ्या फुलाने सुगंधही द्यावा किंवा सुगधं देणाऱ्या फुलाने सूंदर सुद्धा दिसावं.
आपण त्याला त्याच्या angle ने पहावं लागेल, तर ते खूप सूंदर वाटेल, मन प्रसन्न करेल. 
 आभाळाला भिडायला गेलेला एखादा गर्द झाडांचा डोंगर किंवा वेगळ्या आकाराचा उजाड डोंगर सुद्धा त्याच्या नजरेनं पाहिलं तर सूंदर दिसतो..!!
क्षितिजाला टेकलेलं आभाळ, ते आभाळ वेगवेगळ्या आकाराच्या कलाकृती धारण करत असल्याचा भास होणं अन् त्या कलाकृती, मनात निर्माण झालेल्या कुतूहलाने शांतपणे तासन् तास निहाळत राहणं, मनात नवचेतना निर्माण करतं.
ते क्षितिजापल्याडचं आभाळ सकाळी अन् संध्याकाळी सोनेरी रंग धारण करतं तेव्हा तो सोनेरी क्षण कधीही सरू नये असंच वाटतं...!!
हे पाहिल्यावर- अनुभवल्यावर चेहऱ्यावर नाजूक हसू फुटते अन् हा क्षण कोणत्याही आनंदाच्या क्षणांपेक्षा अतिउच्च असतो..!!
निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या जगण्याशी-आयुष्याशी साधर्म्य दाखवते. एक जगण्याचं तत्वज्ञान सांगते.
फुलं देण्यामागचं प्रयोजन काय असू शकतं? त्यात एक सुप्त संदेश असतो की, या फुलांप्रमाणे बहरत रहा, 
            फुलत रहा, परोपकारी असा, 
समोरच्याला आनंदाच्या खाऊची वाटप करा.    
              सदाबहार असा...!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

6 comments:

  1. रंगीबेरंगी फुलांच विश्व आणि आयुष्याची सांगड स्वच्छंदी जगणं शिकवतं.
    सुंदर लिहिलंय...👍

    ReplyDelete
  2. मस्तच...।। आयुष्य जगाव तर अगदिच फुलांप्रमाणे क्षणिक पण सर्वांना आनंद देऊन, सुगंधित करून!!!

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं ।।।।
      धन्यवाद ।।।।

      Delete

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...