Monday, November 9, 2020

अल्लड पाऊस....!!

डाव जो मांडला होता,
खेळ तो रंगला होता.

एक एक आठवण मनात साठवली होती,
प्रत्येक क्षणांची लघोर रचली होती,
पण रचता रचताच ती कोसळी होती.

आजही पडतो पाऊस अंगणी,
आजही भिजते नयनीची पापणी.

काळ लोटत आहे पाऊस पडत आहे,
बेधुंद पडणारा पाऊस खिडकीतून दिसतो आहे.

पण आतश्या पाऊस नाही करत 'चिंब' भिजल्यावर,
ज्या पावसात नाही दिसत 'थेंब' नयनातून पडल्यावर.

तो पडतो प्रेमभराने,
 देवूनी दुःख विरहाचे.

झाडाच्या पानांवरून पडणारा पाऊस,
पहिल्यासारखा भासत नाही.
गालांवरून घरंगळत येणारा थेंब,
अंगी शहारे उमटवत नाही.

पण तरीही भिजणं मात्र थांबलं नाही,
कधी अंगणी तर कधी मनोमनी.

आजही दिसते खिडकीतून भिजणारी 'ती',
आजही भासते मज अल्लड 'ती'.
पाऊस पडतो जसा झाडाच्या पानांवरून अंगणात
तसाच तिच्या गालावरून कल्पनेच्या कुंचल्यात....!!

#काल्पनिक😍
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...