जगणं म्हणजे तरी काय...??
लागलेली ठेच,
झालेलं दुःख,
व्हिवळणाऱ्या वेदना,
बोचणारे शल्य,
अपूर्ण स्वप्ने,
तुटलेलं मन,
पण तरीही,
उद्यासाठी
फाटलेल्या जुन्याच स्वप्नांना
नव्याने ठिगळं लावणं,
अन् तीच नवी मानणं.....
जगणं म्हणजे तरी काय...??
कालचीच वही,
कालचीच लेखणी,
काही अक्षरं खोडलेली,
काही नव्याने लिहीलेली,
यात लिहीलेली समाधानी जरी भासती,
पण खोडलेली मात्र लक्ष वेधती....
जगणं म्हणजे तरी काय....??
ओंजळीत जपलेली,
पारिजातकाची फुलंच..
काही सुकलेली,
काही चुरगळलेली,
काही मात्र,
तिन्हीसांज होईस्तोवर
रेती निसटावी तशी
ओंजळीतून निसटलेली....
जगण्याच्या याच हिशोबात
बाकी मोजकीच उरते,
उरलेल्या फुलांपेक्षा
निसटलेला फुलांत
मन मात्र गुंतून राहते..
#जगणं #आयुष्य❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
जगणं म्हणजे काय..
ReplyDeleteमनातल्या सुप्त भावना अशाच शब्दांत उमटवता याव्यात,
अन् आपल्याच शब्दांनी भावना बकुळीहूनही सुगंधी व्हाव्यात!
Keep writing!🍂
🙏🙂
Delete