Sunday, January 23, 2022

आम्ही प्रवासी...!!

 

अंधाऱ्या रात्री आम्ही प्रकाश शोधत राहिलो,
कवडश्यांच्या अस्तित्वाला कमी लेखत राहिलो,
काजव्यांनी नव्हता दिसणार मार्ग जरी,
पण तेच तर  प्रकाशाची ज्योत तेवत ठेवणारी,

म्हणून घडणाऱ्या घटनेला कमी लेखायचं नसतं,
जे होणारं असतं ते काहीतरी देणारं असतं,
विजयाला पुढची वाट देईल,
पराजयाला प्रवासाची ओळख होईल,

विजय पराजय हा आपल्या मनीचा खेळ असतो,
जो मनावर एक चाल सरस करतो,
तो विजयाची पताका फडकावतो,

एका विजयाने एका पराजयाने स्वतःला तोलायचं नसतं,
संघर्षाचं, झालेल्या जखमांचं मोल जाणायचं असतं,

प्रवास आहे , उशीर होणं, गाडी लवकर जाणं हे सहाजिकचं,
म्हणून नशिबाला बोल लावून, डोकं आपटनं हे मात्र चुकीचंच,

एक थांबा गेला म्हणून हार होते असं नाही,
अनवाणी पायांच्या प्रवासाला कधी विसरायचं नाही,
मिळालेल्या छोट्या मोठ्या क्षणांनी आयुष्य फुलवायचं असतं,
चालता चालता अविस्मरणीय क्षणांची फुलं वेचायची असतात,
त्यांच फुलांना एकमेकात गुंफूण ती जपायची असतात, आयुष्याच्या संध्याकाळच्या एकांताच्या सोबतीसाठी....!!

#प्रवास❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

6 comments:

  1. खुप मस्त सर 👌❤ आपण असेच लिहित जा आमच्यासारख्या असंख्य वाटसरू साठी हे बोल खुप प्रेरित करतील

    ReplyDelete
  2. खूप भारी लिहिलंय ....sir ji...keep it up..❣️🤘

    ReplyDelete
  3. खरंच छान लिहलंय सोमनाथ.तुझ लिखाण हे नेहमी प्रेरणादायी असतं.भावी वाटचालीस खूप शुभेच्छा.

    ReplyDelete

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...