कधी कृष्ण, कधी अर्जुन
तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!!
चूक बरोबर , चांगलं वाईट,
याच्या परिसीमा व्यक्तीगणिक
ह्या आगळ्या वेगळ्या...!!
इथं,
कोणासाठी कर्ण, कोणासाठी अर्जुन,
तर कोणासाठी कृष्ण ही विरोधातला...!!
सगळंच सगळ्यांच्या वाट्याला येत नाही,
जे त्या विधात्यास न चुकलं
त्यातून आपण काही सुटणार नाही...!!
त्याचमुळे,
कोणास भासे कृष्ण,
कोणास लाभे अर्जुन,
तर कधी
आपणच आपला व्हावा
कर्ण...!!
जरी जगास,
अभाग्यतेचा दुर्लक्षीलेला योद्धा वाटला,
पण त्याने त्याचा धर्म जपला...!!
आईचं वचनासाठी
श्रीकृष्णाच्या शब्दांपाई
मृत्यूही आनंदाने कवटाळला...!!
त्यास सर्व ठावूक होतं,
योग्य अयोग्य माहीत होतं...!!
पण, पण....
पुन्हा तेच
चूक बरोबर, वाईट चांगलं,
हे आपण आपल्या नजरेतून ठरवतो,
त्यामुळे योग्य अयोग्य हे बदलत राहतं
कायम ऋतुचक्रासारखं...!!!
अन् आपण मात्र वैचारिक गोंधळात जातो
तिथंच आपला अर्जुन होतो...
तेव्हा मात्र हवा असतो
श्रीकृष्ण भागवत गीतेच्या आरंभासाठी...
कलियुगातल्या प्रत्येकाच्या मनातल्या युद्धासाठी...!!!
#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
