माळलेल्या मोगऱ्याचा गंध अजूनही
नसात भिनतो आहे...
गालावर रुळलेली, वेढण घातलेली,
बट आठवताच तो अजूनही भुलतो आहे...!!
भुलनं, भिणनं यास जग आकर्षण म्हणत
लेबलं लावील..
'तो' मात्र आयुष्याच्या संध्याकाळीही
चिरतरुण यौनातली "तुज" आठवत राहील...!!
#जगणं #प्रेम #आदर #काल्पनिक❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
No comments:
Post a Comment