आभाळ दाटून आलं तरी,
कोसळनं मात्र थांबलंय...!!
श्वास अडकलेल्या पाखरासम,
मन आता स्तब्ध झालंय...!!
कातरवेळीच्या सूर्यानंही,
क्षणभर क्षितिजावर आता थांबणं सोडलंय...!!
अथांग सागरावरती मात्र,
मनपाखरू क्षितिज शोधतंय..!!
डौलणाऱ्या वाऱ्याबरोबर,
निरोप घेणाऱ्या सुर्यासंगे,
न संपणारी शर्यत लावतंय..!!
लाटा आता सौम्य झाल्या,
किनाऱ्याला जाब विचारण्यासाठी...
तेव्हा पावलं मात्र थबकली,
मागं वळून पाहण्यासाठी...
तेव्हा उमटली पावलं जरी रेतीवरती ,
काटे मात्र टोचत राहती...
पुढच्याच क्षणी मात्र
मिळालेली फुलं आठवती...
संघर्षाच्या या पर्वाला,
तोलनं इतकं कठीण नाही,
काय मिळवलं काय गमावलं..?
इतकं छोटं गणित नाही...!!
ओंजळीतलीच फुलं आता
देव्हाऱ्यात ठेवू,
ओंजळीतून निसटणाऱ्या
क्षणांना आता बंधमुक्त करू....!!
#मनपाखरू❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
Beautiful Lines...Sirji..keep it up 😊
ReplyDeleteThank you,❣️🙏
ReplyDelete