Friday, June 10, 2022

जपलेला कृष्ण...!!

प्रत्येकाच्या मनाच्या तळघरात,

स्वतःचा असा एक कृष्ण जपला जातो,

कधी सखा बनवून, कधी सोबती होऊन,

तर कधी कधी मनामनात नकळत राहतो,

प्राणप्रिय बनून...!!


जेव्हा कधी एकांतात असताना

मनाची कवाडं उघडून,

मनसोक्त संवादाचा नाद घुमतो,

कुठंच कधीच काही व्यक्त न होणारं

तेव्हा सगळं सगळं व्यक्त होतो....!

यात प्रत्येकवेळी कृष्ण खूप विश्वासार्ह वाटतो...!!


संकटांची वादळं घोंघावत असताना,

आयुष्याची नौका त्यावर हेलकावे घेताना,

त्याच वादळांच्या छेडून तारा,

हेलकाव्यांचं तो गीत गाणारा,

त्याच गीताचे होऊन गाणे तो कालिया मर्दन करणारा,

असा तो आपला कृष्ण कायम ह्रदयी वसणारा...!


नश्वर जीवनाच्या बासरीत

फुंकर घालून,

लयबद्ध सूर उमटवतो...!!

सुख दुःखाच्या लपंडावाचा

खेळ चांगलाच रंगवतो...!

असा प्रत्येक मनीचा कृष्ण

आनंदाच्या क्षणी लोप पावतो,

पण दुःखाच्या रात्री 

नकळत पाठीवर हात ठेवतो...!!

म्हणूनच नकळत मोह मायांचा लगाम आवरत,

जीवनाच्या रथाचं सारथ्य त्याच्याकडे सोपवायचं असतं,

आपला स्वतःचा तो कृष्ण ओळखायचा असतो,

अन् जपायचा असतो 

स्पंदनातल्या प्रत्येक श्वासागणिक ....!!


#माझा_कृष्ण❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

14 comments:

  1. Some are artists; Some are themselves an Art🍂!!
    Great going; keep writing..

    ReplyDelete
  2. Nice, तूझी लेखणी प्रगल्भ होतेय छान लिहितो, असच लिहीत रहा.

    ReplyDelete
  3. कृष्ण सखा,
    कृष्ण पाठीराखा
    जगतउद्धारक
    असे कृष्ण🌼

    तो शंखचक्रगदाधारी
    परि हाती शोभे बासुरीही
    ऐसा मनमोहक
    असे कृष्ण 🌼
    🙏

    ReplyDelete
  4. सुंदर लिखाण

    ReplyDelete

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...