कातरवेळी 'तो' बरसतो,
आठवणींच्या प्रदेशात,
ओलंचिंब करतो...!!
रोमारोमात सर्वांगात,
मातीचा सुगंध पसरतो,
अंगणाच्या कोपऱ्यावर
रातराणीचा बहर येतो...!!
सांजवेळी
सूर्य जाताना,
खिडकीतून पाऊस
पाहताना,
कैक आठवणींचा
पट डोळ्यासमोर येतो..!!
अन् पुन्हा नव्याने
'तो' जपला जातो
कुपितल्या संपत आलेल्या अत्तरासम.....!!
#पहिला_पाऊस❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
🍂 पावसाशी मन जुळलं की साऱ्या भावना आपोआप ओल्या होऊन जातात!
ReplyDeleteAlways keep Writing!!
धन्यवाद जी 🍃🙏
ReplyDelete