Sunday, February 14, 2021

साथ...!!


                   नको मज तुझा एक दिवस हात हाती,

पण असावा आयुष्याच्या संध्याकाळी,


समुद्र किनारी बसुनी,

पाहावी कातरवेळ तुझ्या नयनांनी,


थरथरणारा हात तो,

होई शांत तुझ्या स्पर्शानी,


ती कातरवेळ,

ती संध्यावेळ आयुष्याची,

अन् तेव्हा असावी साथ तुझी...!!


#कल्पनेतील_ती

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

4 comments:

  1. तुमच्या कल्पनेतली ती ...
    लवकरच सत्त्यात ही येवो....😊

    ReplyDelete
  2. नको बाबा
    एकटा जीव सदाशिव छान असतो...!!
    हा लिखाणाचा प्रपंच म्हणजे कल्पनेचे पतंग बाकी काही नाही ...!!

    ReplyDelete
  3. कल्पनेतील 'ती' वास्तवातही कल्पिलेलीच मिळेल!
    Keep Writing!

    ReplyDelete
  4. 😄😄 नको हे फक्त कल्पिलेलंच छान असतं

    धन्यवाद

    ReplyDelete

सर्द भिजलेला....!!!

ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...